श्री क्षेत्र जांबुवंत गड, जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना

महाराष्ट्रातील एकमेव भारतातील तिसरे असणारे श्री क्षेत्र जांबुवंत गड अतिशय पौराणिक व ऐतिहासिक असणारे एकमेव अद्वितीय स्थान

Jambuvant Maharaj

पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व

जांबुवंतांचे महाराष्ट्रातील एकमेव स्थान – जामखेड (ता. अंबड, जालना). श्री क्षेत्र जांबुवंत गड हे अतिशय पौराणिक आणि ऐतिहासिक असणारे एकमेव अद्वितीय स्थान आहे.

छत्रपती संभाजीनगर अथवा जालना येथून साधारण एक ते दीड तासाच्या अंतरावर हे स्थान आहे. धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अंबडकडे जाणारा रस्ता आहे, तेथे जामखेड गाव वसलेले आहे. जुन्या काळात दंडकारण्यात या भागाचा समावेश होता. डोंगरदर्यात असलेल्या या गावापासून दोन किमी अंतरावर असणाऱ्या गुहेत जांबुवंत, नळ, नील यांची मंदिरे आहेत. याशिवाय गणपती, महादेवाची वसती आहे. रामायण, महाभारतकालीन संदर्भ या मंदिरांना आहेत. ‘जांबुवंतगढी’ असे नावाने हे स्थान ओळखले जाते.

श्री ब्रह्मदेवाच्या जांभईतून जांबुवंत यांचा जन्म झाला, अशी आख्यायिका आहे. तसेच अग्निदेव आणि स्वर्गातील एका गंधर्व मातेच्या पोटी जन्मलेले जांबुवंत… त्यांचा जन्म सत्ययुगात झाला असून ते सात चिरंजीवांपैकी एक असल्याचे वर्णन आहे. त्यामुळे चारही युगांमध्ये (सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार व कलियुग) जांबुवंत असणार आहेत. सत्ययुगात उत्पत्ती झाल्यामुळे ते परशुराम व हनुमान यांच्या पेक्षा वयानं मोठे आहेत. अतिशय विद्वान, वेद जाणणारे, द्रष्टा अशी त्यांची ख्याती आहे. त्यांना ‘ऋषिराज’ असे म्हणतात. दोन पायांवर चालणारे अस्वल आणि मनुष्य यांचं एकत्रित रूप म्हणजेच ब्रह्मदेवाने तयार केलेल्या प्रजातींपैकी एक जाती… एकेकाळी ही जात माणसांपेक्षा अधिक प्रगत होती.

स्थान

जामखेड, ता. अंबड, जि. जालना

मुख्य उत्सव

श्री क्षेत्र जांबुवंतगड अधिक मास उत्सव

प्राचीन आख्यायिका

त्रेतायुगातील रामायण काळातील कथा

दिव्य सेनेचे सेनापती

रामायणात रावणासोबत युद्ध करताना प्रभू श्रीरामांनी जांबुवंताची नियुक्ती सेनापती म्हणून केली होती. ते परमध्यानस्थ, युद्धकलेत पारंगत आणि आयुर्वेदात निपुण होते. लक्ष्मणाला युद्धात जबर दुखापत झाल्यावर हनुमानाला संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हिमालयात पाठवण्याचा सल्ला जांबुवंतांनीच दिला होता. रावणाचे युद्ध जिंकल्यावर जांबुवंतास थोडा अभिमान वाटला आणि श्रीरामांनी त्यांना कलियुगापर्यंत एकांतवासात तप करीत राहण्याची सूचना दिली, म्हणून ते गुहांमध्ये राहू लागले.

एकांताची इच्छा

रामायणात सीतेला शोधण्यासाठी प्रभू रामाच्या फौजेत जांबुवंत सल्लागार म्हणून काम करत होते. हनुमानाने समुद्र पार जावे यासाठी त्याला जांबुवंतांनी प्रेरणा दिली. राम-रावण युद्ध संपल्यानंतर प्रभूने सर्वांना बक्षिसांचे वाटप केले. जांबुवंताला विचारल्यावर त्यांनी एकांतवास आणि रामाशी पुन्हा युद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर रामाने एकांताचे स्थान म्हणून जामखेडची गुहा दिली आणि कृष्णावतारात युद्धाची संधी पुन्हा दिली जाईल, असे आश्वासन दिले.

Lord Rama granted Jamkhed cave as a place for his eternal penance.
Krishna Battle
द्वापारयुगातील महाभारत कालात कृष्णासोबत युद्ध

स्यमंतक मणीसाठी युद्ध

श्रीकृष्णाला सत्राजित आणि प्रसेनजित नावाचे बंधू होते. सत्राजिताला सूर्यदेवाने प्रसन्न होऊन ‘स्यमंतक मणी’ नावाचा तेजस्वी मणी दिला. एकदा प्रसेनजित मणी घालून शिकारीस गेला असता सिंहाने त्याला मारले. त्याचवेळी तिथे आलेल्या जांबुवंतांनी सिंहाला ठार करून मणी आपल्या गुहेत नेला आणि तो मणी आपल्या मुलीसाठी खेळण्यासाठी दिला. मणी चोरीचा आरोप कृष्णावर झाल्यावर त्यांनी शोध घेतला असता ते जामखेडच्या गुहेत पोहोचले. तेव्हा दोघांमध्ये २८ दिवस जामखेड येथे युद्ध झाले. या युद्धात दोघांच्या शरीरातून घाम येऊन नदीची निर्मिती झाली, तिला "घामती नदी" म्हणतात. जांबुवंतांनी कृष्णाला ओळखल्यावर स्यमंतक मणी दिला आणि आपली मुलगी "जांबुवंती"चा विवाहही श्रीकृष्णाशी लावून दिला.

बारा वाड्यांची विलक्षण परंपरा

रामायणात जांबुवंत महाराजांचे स्थान मोठे असल्यामुळे जामखेड परिसरातील बारा वाड्या (जामखेड, जोगेश्वरीवाडी, बक्षीचीवाडी, किनगाववाडी, निहाळसिंगवाडी, पाचगाववाडी, लेंभेवाडी, माळेवाडी, भोकरवाडी, कौचल्यावाडी, विठ्ठलवाडी, नारळेवाडी, कोंबडवाडी) मध्ये हनुमानाचे मंदिर नाही. वयाने आणि अनुभवाने जांबुवंत महाराज मोठे होते, त्यामुळे त्यांना "काका" असे संबोधले जाते. या भागात मंगळ कार्याच्या वेळी हनुमानाऐवेजी श्री क्षेत्र जांबुवंतगडावर येण्याची प्रथा आहे.

इतिहास आणि जीर्णोद्धार

पर्वत गुहेत असणारे व जाण्यासाठी अतिशय कठीण असणाऱ्या मंदिराचा १९९३ साली जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात सभागृह व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर शुक्रवारी जामखेडचे ग्रामस्थ मंदिरात दर्शनासाठी येतात.

Sabha Mandap

श्री क्षेत्र जांबुवंतगड अधिक मास उत्सव

आमचा १००% पारदर्शकतेवर विश्वास आहे. सर्व देणग्या आणि खर्च रिअल-टाइममध्ये तपासा.

संपर्क साधा

पत्ता

जामखेड, ता. अंबड, जि. जालना, महाराष्ट्र

ईमेल

-

फोन

-